राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट व वंचित यांची युती ; तर शिंदे सेना व काँग्रेसचे स्वतंत्र उमेदवार
गेवराई (रिपोर्टर) आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटची तारीख असून अनेकांनी आपले उदेवारी अर्ज दाखल केले असून गेवराई नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार म्हणून सौ.गीताभाभी बाळराजे पवार यांनी साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
तर
राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट व वंचित यांनी युती करत आपला उमेदवार दिला असून शिवसेना शिंदे गट व काँग्रेसने आपले स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरले असले तरी प्रमुख लढत ही भापज व राष्ट्रवादी यांच्यातच होणार असली तरी ईतर पक्षांनी आपली दाखवण्यासाठी स्वतंत्र उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात उतरवले असल्याचे दिसत आहे.
गेवराई नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून या ठिकाणी भाजप राष्ट्रवादी अशी सरळ लढत होणार असल्याचे दिसत असून इतर पक्षांनी आपली ताकद दाखवण्यासाठी उमेदवार उभे केले आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट,शिवसेना ठाकरे गट व वंचित यांनी एकत्र येऊन आपला उमेदवार उभा केला आहे. शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रीय काँग्रेस यांनी आपले स्वतंत्र उमेदवार दिले असून या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी ते मैदानात उतरले आहेत. दरम्यान गेवराई नगरपरिषदेत भाजपच्या सौ. गीताभाभी बाळराजे पवार व राष्ट्रवादीच्या सौ. शितल महेश दाभाडे यांच्यातच प्रमुख लढत होणार असल्याचे दिसत आहे.













