आष्टी (रिपोर्टर):- तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मागिल महिन्यात निष्पाप राजेंद्र गोल्हार यांचा बळी गेला आहे.त्यासोबतच जनावरं बिबट्यांनी हल्ले करत फस्त केले आहेत.तालुक्यातील ठिकठिकाणी भाग बदलून परिसरात बिबट्यांच्या नियमित दर्शनानं नागरिक भयभीत झाले आहेत.बुधवारी रात्री 10 च्य म्हसोबावाडी,घाटा-पिंपरी,धामणगाव रोडवरील घाटापिंपरी येथील घाट परिसरात श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावरून दर्शन करून परत येत असताना युवकांना बिबट्या नगर-बीड महामार्ग ओलांडताना दिसला.वेळ रात्री अकराची फोर व्हीलर गाडी असल्याने बिबट्या रस्त्याच्या कडीने जाताना व्हिडिओ काढला असून तरुणांनी पोलिसांना बिबट्याची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकार्यांना कळविण्यात आले. तेही दाखल झाले. बिबट्या प्रश्नावर प्रशासनानं त्वरित ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी, घाटा-पिंपरी,धामणगाव रोडवरील घाटापिंपरी घाट परिसरात वनविभागाच्या परिक्षेत्रात बुधवारी रात्री 11 वाजता बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती मिळाली आहे. श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावरून दर्शन करून परत येत असताना
आष्टी सद्गुरु ग्रुपच्या युवकांना बिबट्या नगर-बीड महामार्ग ओलांडताना दिसला.महाराष्ट्रभर सुरू असलेल्या बिबट्याच्या धुमाकूळाने आष्टी तालुक्यातील गावात बिबट्याचा संचार असल्याने व वारंवार हल्ल्याच्या घटना घडत असल्याने घबराटीचे वातावरण पसरले असून, पांगुळगव्हाण येथील शेतकरी जनार्धन महादव गिते यांच्या राहत्या घरी रात्री एक वाजता शेळीचा फडशा पडला असून या शेतकर्याने बिबट्या पाहिला असून याची माहिती वन विभागाला दिली आहे.परिसरात दहशत निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात बहुतांश शेतकरी शेतामध्ये वस्ती करून राहत असल्याने व जनावरेही राहत असल्याने मोठी भीती निर्माण झाली आहे. बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करून जेरबंद करावे, अशी मागणी नागरिक व शेतकर्यांमधून होत आहे. बिबट्याच्या वावर असलेल्या गावांमध्ये व रात्री पडलेल्या शेळीचा फडशा या घटनास्थळी आष्टी तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी एड.डी.मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अशोक काळे, बन्सी तांदळे, दत्तात्रय भुकन,जयसिंग मोहिते वन विभाग अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध सुरू आहे.
नागरिकांनी अजिबात घाबरू नये अवतीभोवती आवाज असेल तर धोका होणारच नाही
बिबट्याचा वावर आहे चार-पाच गावांमधून फोन येत आहेत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.परंतु इतर ठिकाणी बिबट्याच्या घडत असलेल्या घटनेत आपल्या घटना भिन्न आहेत.नागरिकांनी भीती न बाळगता बिबट्यापासून संरक्षणासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी दरेवाडी येथे मागील महिन्यात घडलेली घटना ही अपघात होता या झालेल्या घटनेतील बिबट्या हा आपला भाग सोडून गेला आहे. त्याचा वनविभागाने ट्रॅक केला असून आपल्या परिसरातील बिबट्या हे डोंगरदर्या जन्मलेले असल्यामुळे त्यांच्यापासून भीती चे प्रमाण कमी असते ऊसामध्ये जन्मलेले बिबट्या हे नरभक्षक होत असतात नागरिकांनी शेतात काम करताना योग्य ती खबरदारी घ्यावी रेडिओसारखा मोठा आवाज असलेले उपकरणे आपल्या सोबत ठेवावेत शेतात काम करत असताना आपल्या गळ्याभोवती मफलर गुंडाळलेली ठेवावी वरिष्ठ स्तरावर बिबट्याचे हल्ले यावर नियंत्रण आणण्यासाठी हालचाली सुरू असून तूर्तास तरी नागरिकांनी आपले संरक्षण करण्यासाठी काळजी घ्यावी काळजी घेतल्यास धोका होणारच नाही बिबट्या दिसल्यास बिबट्याला मार्ग द्या, स्वतःमागं सरका आणि त्याला जाऊ द्या.बिबट्याकडं तोंड करून हळूहळू मागं सरका. इतरांना बिबट्या दिसल्याची माहिती द्या म्हणजे तेही सतर्क राहतील
– ए.डी.मुंडे ( वनपरिक्षेत्र अधिकारी,आष्टी )












