वडवणी (रिपोर्टर) मुलीला प्रसुतीसाठी मध्यरात्री बीड येथील खासगी दवाखान्यात दाखल केले असता घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचे पत्रे उचकटून घरात प्रवेश करत लोखंडी पेटीत ठेवलेले दहा तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 71 हजार रुपये लंपास केल्याची घटना मध्यरात्री तालुक्यातील डुकरेगाव येथे घडली.
मोहन सोपान कराड (रा. डुकरेगाव ता. वडवणी) यांची मुलगी प्रसुतीसाठी गावी आली होती. मध्यरात्री तिला प्रसुतीच्या वेदना होत असल्याने तिला एका वाहनातून बीड शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे पत्रे उचकटून घरात प्रवेश करत लोखंडी पेटीत ठेवलेले दहा तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 71 हजार रुपये लंपास केले. सकाळी कराड हे घरी गेल्यानंतर आपल्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी घटनेची माहिती वडवणी पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.