Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home महाराष्ट्र वाढलेल्या दरांवर उपाय; पेट्रोल एकदाच ५ रुपयांनी स्वस्त होणार?

वाढलेल्या दरांवर उपाय; पेट्रोल एकदाच ५ रुपयांनी स्वस्त होणार?


नवी दिल्ली (वृत्तसेवा):- पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी विक्रमी किंमत गाठली आहे. मुंबईत पेट्रोल ९०.८३ रुपये प्रति लिटर आहे, तर दिल्लीत पेट्रोलचा दर पहिल्यांदाच ८४ रुपयांवर गेला आहे. यावर उपाय म्हणून पेट्रोलियम मंत्रालयाने सरकारला महत्त्वाची शिफारस केली. उत्पादन शुल्कात कपात करुन जनतेला दिलासा देण्याची शिफारस सरकारला करण्यात आली आहे. करोना काळात पेट्रोल, डिझेलवर जो कर लावण्यात आला होता, त्याची किंमत ५० टक्क्‌यांनी कमी केली तरी ५ रुपयांपर्यंत दर कमी होऊ शकतात.


लॉकडाऊनमध्ये सरकारने एकदाच १० रुपये शुल्क वाढवलं होतं. उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर ग्राहकांना याचा थेट लाभ देण्यासाठी राज्यांनाही सहकार्य करावं लागेल, असं सरकारचं म्हणणं आहे. राज्यांनी व्हॅटमध्ये कपात करुन केंद्राला सहकार्य करावं, असं पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटलं आहे. दर कमी करण्यासाठी व्हॅटमध्ये कपात आणि तेल कंपन्यांवरही काही ओझं टाकलं जाऊ शकतं. तेल निर्मिती करणार्‍या देशांची संघटना ओपेक राष्ट्रांनी निर्मितीत कपात केल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वेगाने वाढत आहेत. याच कारणामुळे देशातील कंपन्यांनीही २९ दिवसांनंतर किंमती वाढवणं सुरू केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्यामुळे कच्च्या तेलाचे दर ५० डॉलर प्रति बॅरलच्या वर गेले आहेत. हे दर येत्या काळात ५४-५८ डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतात. अशी परिस्थितीत झाल्यास भारतात ६-८ रुपये प्रति लिटरची वाढ होऊ शकते. डिझेलच्या किंमतीतही मोठी वाढ अपेक्षित असल्याचं जाणकार सांगतात.

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....