बीड (रिपोर्टर)- आष्टी नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष तथा आ. सुरेश धस यांचे विश्वासू नवाब खान यांचे दु:खद निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाने आष्टी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. नवाब खान हे आष्टी येथे ‘मामू’ म्हणून परिचीत होते. अत्यंत गरीब कुटुंबातील ते व्यक्तिमत्व होते. त्यांना नगरपंचायतवर अध्यक्ष होण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले होते.
नवाब खान यांना दुर्धर आजार जडला होता. या आजाराशी झूंज देत असताना त्यांची आज सकाळी प्राणज्योत मालवली. नवाब खान हे आष्टी नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष होते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ते आष्टी तालुक्यात सर्वपरिचीत होते. आ. सुरेश धस यांचे ते अ्रत्यंत विश्वासू होते. आज दुपारी दोन वाजता काली मस्जिद या ठिकाणी त्यांचा दफनविधी होणार आहे. नवाब खान यांच्या निधनाने आष्टी शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.