वडवणी (रिपोर्टर):- वडवणी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकाने शाळकरी मुलींसोबत गैरवर्तन केल्याचे कृत्य उघडतील पडले आहे. शाळकरी मुलींचे आई-वडिलांसह गावातील इतर ग्रामस्थांनी वडवणी पोलिसात हजेरी लावत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर दुपारी दीड वाजेपर्यंत सदरील प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
वडवणी तालुक्यातील एका जि.प. प्राथमिक शाळेतील कार्यरत असणार्या एका शिक्षकाने इयत्ता 6, 7 वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या तीन मुली सोबत गैरवर्तन केले आहे. तसेच गैवर्तन केलेल्या मुलीला तंबी देखील या शिक्षकाने दिली आहे. सदर घडलेला प्रकार शाळकरी मुलींनी आई-वडिलांना सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस आले आहे. सदरील प्रकार हा शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा आहे. तर सकाळीच शाळकरी मुलींसह नातेवाईक व ग्रामस्थ यांनी वडवणी पोलिसात धाव घेतली आहे. तर त्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. वडवणी पोलिसांनी सदरील प्रकरणाचा तपास करत आहेत. दुपारी दीड वाजेपर्यंत याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता. तर वडवणी पोलीस स्टेशनच्या ठाणे प्रमुख तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा व्हगाडे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, फिर्याद देत आहेत. मी आत्ताच सांगू शकत नाही, आई-वडिलांशी चर्चा करून काय ते सांगते. गुन्हा दाखल झाल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल. अशी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काय तो प्रकार समोर येईल.











