बीड (रिपोर्टर): माजलगाव तालुक्यातील लऊळ येथील एका घरारमध्ये धाडसी चोरी झाली. चोरट्याने घरामध्ये प्रवेश करत लॉकर तोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 11 लाख 46 हजार 346 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप लिंबाजी पवार (रा. लऊळ नं. 1) यांच्या बेडरूमच्या दाराला कडी लावून आतमध्ये प्रवेश कत घरातील लॉकर उघडून आतील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 11 लाख 46 हजार 346 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. आपल्या घरात चोरी झाल्याचे संदीप पवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविररोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











