आष्टी (:रिपोर्टर ):-
आष्टी तालुक्यात जोरदार वादळी वा-याचा तडाखा बसला असून डोंगरगण,गहुखेल परिसरातील घराशेजारील झाडे मोडून पडली तर मोठ मोठी झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत. परिसरात अनेक ठिकाणी विद्युत तारेवर फांद्या पडून तारा तुटल्या आहेत.तर काही ठिकाणी पोल ही पडले आहेत.त्यामुळे परिसरातील विजपुरवठा खंडीत आहे.याबाबत माहिती मिळताच उपकार्यकारी अभियंता प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने महावितरणचे कर्मचारी यांचे झाडे हटवून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी जलदगतीने काम सुरू आहे. तालुक्यातील डोंगरगण,गहुखेल परिसरात काल दि.३ सप्टेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊसाला सुरुवात झाली,वादळी वारा इतका भयंकर होता.मोठ मोठी झाडे मुळासकट उन्मळून पडली,अनेक झाडे मोडून विद्युत तारा तुटल्या,व विजेचे खांब ही पडले आहेत.त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.विज नसल्याने मोबाईल टी व्ही मनोरंजन साधने बंद आहेत.विद्युत पुरवठा बंद झाल्याने जिवितहानी टळली आहे.काही ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.मोठे झाडे मुळासकट उन्मळून पडल्याने घर बचावले आहे.विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचारी यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
वादळी वाऱ्याने महावितरण कंपनीचे नुकसान झाले आहे.झाडे पडून तारा तुटल्या आहेत.४ पोल देखील पडले आहेत.कंडक्टर तुटले आहे.विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी रात्रीपासूनच महावितरणचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. – प्रविण पवार ( उपकार्यकारी अभियंता,आष्टी )