बीड (रिपोर्टर) बीड तालुक्यातील बेलेश्वर संस्थान येथील मंदिरातील अज्ञात चोरट्याने बेलेश्वराचे पंचधातूचे व पितळी मुकुट चोरून नेल्याची घटना काल घडली. नेकनूर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
महादेव भारती गुरु संतराम भारती (वय 65 वर्षे) यांनी नेकनूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 19 सप्टेंबर ते 20 सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी बेलेश्वर संस्थान बेलगाव येथील मंदिगरातील बेलेश्वराचे पंचधातूचे व पितळी मुकुट शेषनारायणाची चांदीची मूर्ती लंपास केली. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.