सावरगाव मायंब्यात घरफोडी
साडेतीन तोळ्याच्या दागिण्यासह पन्नास हजार लंपास
बीड, (रिपोर्टर):- बंद दरवाजाचे कुलूप तोडुन अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले 35 ग्रॅमचे सोन्याचे दागिणे आणि रोख पन्नास हजार रूपये लंपास केल्याची घटणा अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरगाव मायंबा शिवारात घडली. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
आदीनाथ भाऊराव भगत रा. सावरगाव मायंबा ता.आष्टी या कोल्ड्रींग एजन्सी चालक यांचे सावरगाव मायंबा शिवारात घर आहे. ते आपल्या परिवारासह तेथे राहतात. काल रात्री 1 ते 3 च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद दरवाजाचे कुलूप तोडुन घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे 35 ग्रॅमचे दागिणे आणि रोख 50 हजार रूपये लंपास केले. सकाळी उठल्यानंतर भगत यांच्या आपल्या घरी चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी अंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध तक्रार दिली.










