• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

निवेदन देण्यास गेलेल्या पदाधिकार्‍यांसोबत संतोष राऊतांची ‘बाबुगिरी’; अधिकार्‍यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही -कोलंगडे अप्पा

by Beed Reporter
March 20, 2023
Reading Time: 1 min read
0
निवेदन देण्यास गेलेल्या पदाधिकार्‍यांसोबत संतोष राऊतांची ‘बाबुगिरी’; अधिकार्‍यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही -कोलंगडे अप्पा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) शेतीमालाला भाव नाही, त्यात अवकाळी पावसाने झोडपले, त्यात गारपिटीने शेतातील उभे पीक उद्ध्वस्त केले. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना मदत द्या, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन गेलेल्या शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी अपमानास्पद वागणूक देण्यास सुरुवात केल्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसंग्रामच्या पदाधिकार्‍यांनी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांच्या वागणुकीवर तीव्र आक्षेप घेत संतप्त होऊन बोलण्यास (पान 7 वर)
सुरुवात केली. यामुळे काही काळ याठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकरी अडचणीत असताना प्रशासनातील अधिकारी अशी मुजोरपणाची वागणूक देत असतील तर शिवसंग्राम हे खपवून घेणार नाही, असा इशारा प्रभाकर कोलंगडे अप्पा यांनी दिला.
आज दुपारी शिवसंग्रामचे नेते प्रभाकर अप्पा कोलंगडे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी याबाबतचे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले, त्याठिकाणी ते निवासी जिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या कॅबिनमध्ये गेलेे असता राऊत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दरडावून बाहेर थांबण्याचे सांगितले, एवढेच नाही तर तुमचे निवेदन तहसीलदारांकडे द्या, असेही म्हटले. राऊत यांची भाषाशैली ही मुजोर आणि मस्तवालपणाची दिसून आल्यानंतर शिवसंग्रामचे कार्यकर्ते अधिकच संतापले आणि राऊत यांच्यावर भडकत त्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. एकीकडे संप चालू आहे. त्यात सर्वसामान्य नागरिकांचे कामे होत नसताना वरिष्ठ अधिकारीही बाबुगिरी करत असतील तर हे संतापजनक असल्याचे सांगत अधिकार्‍यांची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असे म्हणत शिवसंग्रामचे नेते कोलंगडे अप्पा यांनी शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत शासन व्यवस्थेने द्यावी, त्याचबरोबर नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत, असेही कोलंगडे अप्पा यांनी म्हटले.

शेतकर्‍यांना तात्काळ आर्थिक मदत करा -शिवसंग्राम
बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात गेल्या तीन चार दिवसापासून अवकाळी पावसासह तुफान गारपीट झाल्याने रस्त्यांसह शेतांमध्ये गारांचा खच साचला होता. त्यामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शेतकर्‍याच्या काढणीस आलेल्या गहू, हरभरा ज्वारी, कांदा या पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे तसेच आंबा, मोसंबी ,पपई, द्राक्ष ,टरबूज इत्यादी फळ पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.
खरीप हंगामातील अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या पिकाचे नुकसान झालेलं होते त्या नुकसानीची भरपाई अजून शेतकर्‍याना मिळालेली नाही. कापूस,कांदा व हरभरा या पिकास भाव नसल्याने शेतकर्‍याच्या घरात तो तसाच पडून आहे यामुळे शेतकर्‍यास (पान 7 वर)
आसमानी व सुलतानी दोन्ही संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकार अशा संकटात शेतकर्‍यांच्या मदतीला धावून येईल अशी आशा आहे त्यामुळे गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे पंचनामे करून तात्काळ हेक्टरी मदत शेतकर्‍याच्या खात्यात वर्ग करण्यात यावी, अशी मागणी बीड जिल्हा शिवसंग्रामच्यावतीने मा.ना.श्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकार्‍या मार्फत करण्यात आली आहे. या वेळी भारतीय संग्राम परिषदचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे,शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष नारायण काशिद, युवक जिल्हाध्यक्ष रामहोरी मेटे, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,ऊसतोड कामगार नेते बबनराव माने एडवोकेट राहुल मस्के, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट मनीषाताई कुपकर, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष फेरोज पठाण, सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय माने, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, शिवसंग्राम नेते सुहास पाटील मनोज जाधव, शहर उपाध्यक्ष शेषराव तांबे, युवक आघाडीचे शहराध्यक्ष प्रशांत डोरले, महिला आघाडीच्या शिरो उपाध्यक्ष संगीताताई ठोसर,सुवर्णा दरेकर, पिंपळनेर सर्कल प्रमुख गोपीनाथ घुमरे, पालीचे सर्कल प्रमुख एडवोकेट गणेश मोरे, नाळवंडी गणप्रमुख सीताराम घुमरे, शेख कुतुब भाई हरिश्चंद्र ठोसर पांडुरंग बहिर, यांच्यासहाम पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post

पोलिसांनी खाक्या दाखवताच चोरीला गेलेले 8 तोळे सोन्यासह रोख रक्कम घरात आणून टाकली बीड शहर डिबी पथकाला यश

Next Post

डोक्यात दगड घालून पत्नीचा खून; भेंडटाकळी तांड्यावर घडली मध्यरात्री थरारक घटना

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
डोक्यात दगड घालून पत्नीचा खून; भेंडटाकळी तांड्यावर घडली मध्यरात्री थरारक घटना

डोक्यात दगड घालून पत्नीचा खून; भेंडटाकळी तांड्यावर घडली मध्यरात्री थरारक घटना

ताज्या बातम्या

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!
  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?