बीड : तुमची योग शिबिरासाठी निवड झाली आहे. त्याचे पुष्टीकरण लेटर तुम्हाला पाठवत आहोत. त्यासाठी काही माहिती द्या असे म्हणून भमट्याला ओटीपी देताच खात्यातून रोख रक्कम लंपास झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने साबर पोलिसात धाव घेतली.
राजु पंडीतराव दाभाडे (रा. मेन रोड माजलगाव वय 56 वर्षे) यांना 16 फेब्रुवारी रोजी अनओळखी नंबरवरुन कॉल आला आणि तुमची योगा बिशीरासाठी निवड झाली आहे. तुम्हाला पुष्टीकरण लेटर मिळणार आहे. त्यासाठी आम्हाला काही माहीत हवी आहे. असे म्हणून भामट्याने दाभाडे यांच्याकडून ओटीपी घेतला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून 36550 रुपये कपात झाले. या प्रकरणी बीड सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.