बीड (रिपोर्टर) मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी आ वासून उभी असताना केंद्र सरकार मात्र मोदींचं नेतृत्व हे विकासाभिमुख नेतृत्व असल्याचा डांगोरा पिटवत आहे. 1 एप्रिल हा मुर्ख दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुक्यात एप्रिल फुल दिवस म्हणून मोदी विकासाचा वाढदिवस साजरा करणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी दिली.
एक एप्रिल रोजी शिरूरसह तालुक्यातील मुख्य सार्वजनिक ठिकाणी केक कापण्यात येणार आहे. मोदी विकास म्हणजे फसवा विकास असल्याचे दाखवून देण्यात येणार आहे. मोदी विकासाचा वाढदिवस साजरा करून एक प्रतिकात्मक आंदोलन एक एप्रिल रोजी करण्यात येणार असल्याचे सांगून वाढती बेरोजगारी, महागाईसह इतर गोष्टींबाबत विरोधी घोषणा देण्यात येणार असल्याने या आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेख महेबूब यांनी केले आहे.