Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडआता सातबाराचा उतारा बँकेमध्येही मिळणार 52 बँकांचे महसुल विभागासोबत करार

आता सातबाराचा उतारा बँकेमध्येही मिळणार 52 बँकांचे महसुल विभागासोबत करार


बीड (रिपोर्टर):- पीक कर्ज घेत असतांना शेतकर्‍यांना अनेक कागदपत्र बँकेमध्ये दाखल करावी लागतात. एखादा कागद नसा की बँक कर्जाचे प्रकरण नाकारते. मात्र राज्य शासनाने शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी बँकेमध्येच सातबाराचा उतारा उपलब्ध करून देण्याचे निर्देशीत केले आहे. राज्यातल्या 52 बँकांचे महसुल विभागासोबत करार करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना बँकेतून ऑनलाईन सातबाराचा उतारा मिळणार आहे.
राज्य सरकार शेतकर्‍यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी दरवर्षी नवीन उपक्रम राबवत आहे. जवळपास सर्वच प्रक्रिया ऑनलाईन झाल्याने सर्वसामान्यांना तात्काळ कागदपत्र मिळतात. बँकेकडून पीक कर्ज घेण्यासाठी शेतकर्‍यांना तलाठ्याच्या दारात जावून विविध कागदपत्र घ्यावे लागतात. एखादा कागद नसेल तर बँका शेतकर्‍यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात.


शेतकर्‍यांची फरफट होवू नये त्यासाठी बँकेमध्येच ऑनलाईन कागदपत्र उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातल्या 52 बँकांची महसूल विभागासोबत करार करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जनता सहकारी बँक सातारा यासह अन्य बँकामध्ये आता शेतकर्‍यांना 7/12 चा उतारा डिजीटल स्वरूपात मिळणार आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!