• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home Uncategorized

मॅराथॉन अग्रलेख भाग-1 राष्ट्रवादीची शरशय्या अन् पवारांची नीती

by Beed Reporter
May 6, 2023
Reading Time: 1 min read
0
मॅराथॉन अग्रलेख भाग-1 राष्ट्रवादीची शरशय्या अन् पवारांची नीती
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गणेश सावंत
मो. नं. 9422742810
शरद पवार…! महाराष्ट्राच्या राजकारणातलं नव्हे नव्हे तर देशातल्या राजकारणातलं एक वादळ. महाराष्ट्रातल्या राजकारणातले भिष्माचार्य. देशाच्या राजकारणातला एक अविभाज्य घटक. जो काळालाही स्वत:च्या विजयश्रीत नाचवयास भाग पाडणारा तेल लावलेला पहेलवान. अशा एक ना अनेक बिरुदावली लावल्या तरी शरद पवारांच्या कर्तृत्वाचे कौतुक त्या बिरुदावलीतून संपुर्ण होणार नाही. पुन्हा एकदा शरद पवार महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात चर्चेत आले. वयाच्या 83 व्या वर्षी पवारांनी अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा देत एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला अन् महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात एक वादळ उठलं. ते वादळ समर्थकांचे भविष्य उधळून टाकणारं होतं. तर फुटीरवाद्यांच्या पदरात सत्तेचं माप टाकणारं समजलं गेलं. परंतु शरद पवारांचे आजपर्यंत घेतलेले निर्णय हे भावनिक होऊन कधीच नव्हते. पवारांचे निर्णय हे बुद्धी आणि तर्काच्या जोरावर असतात. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा निर्णयाबाबत राज्यात आणि देशात खल तर होणारच होती आणि ती खल दोन दिवस अनेक राजकारण्यांसह राजकीय विश्वलेषकांनी केली. परंतु शरद पवारांच्या त्या निर्णयाचा तळ या सर्वांना लागला असेलच हे सांगणे कठीण. शरद पवार यांचे गेल्या साठ वर्षांचे समाजकारण तुमच्या -आमच्या लक्षात येईल. परंतु पवारांचे राजकारण हे भल्या भल्यांच्या लक्षात कधीच येत नाही. पवारांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना आम्हीही त्यांच्या साठ वर्षांच्या राजकीय प्रवासावर आणि निर्णय क्षमतेवर नजर फिरवली तर आम्हालाही पवारांच्या या निर्णयाबाबत ठोस सांगणे कठीण. परंतु पवारांचा हा निर्णय
पक्षातील फुट
टाळण्यासाठी अटळ मानला जातो. यात दुमत असण्याचे कारण नाही. कारण देशाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ताकारणासाठी ज्या पद्धतीने छोट्या-मोठ्या पक्षात आराजकता माजवत आहे, खोक्याच्या जोरावर मतलबी बोक्यांना आपल्याकडे घेत आहे, त्यावरून स्वत:च्या पक्षात फूट अटळ असणे अन् ती शरद पवारांना न जानवणे हे होऊच शकत नाही. पहाटेच्या शपथविधीपासून सतर्क झालेल्या पवारांनी आपले पुतणे अजित पवारांच्या काटावरच्या धोरणावर चांगलेच लक्ष केंद्रित केले. मध्यंतरी अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची बाळलेली मनिषा, ठिकठिकाणी लागत असलेले पोस्टर हे शरद पवारांच्या खेम्यामध्ये अस्थिरतेची चुणूक दाखवून देत होते. अशा स्थितीत इतर पक्षांना चाणक्य नितीतून सावरण्यास मदत करणारे शरद पवार स्वत:च्या पक्षातील अस्थिरता शमवू का शकणार नाहीत. बुद्धी तर्काच्या जोरावर शरद पवारांनी राजीनाम्याच्या सोंगट्या फेकल्या आणि त्या सोंगट्यातून आलेले नंबर काकांना विजयी करतात की पुतण्याला विजयी करतात, हे गेल्या दोन दिवसात पाहण्यालायक ठरले. शेवटी काका ते काकाच राहिले आणि पुतण्याला ‘काका मला वाचवा हो…’चा अनुभव देता आला. शरद पवारांचं राजकारण आणि राजकारणात फेकले जाणारे त्यांचे फासे समजणे साक्षात
काळालाही अशक्य. म्हणूनच शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर देशभरातील अन्य पक्षांच्या नेत्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया शरद पवार राष्ट्रवादीसाठी जेवढे महत्वाचे तेवढे देशाच्या राजकारणासाठी महत्वाचे मानता येतात.
ऐन सुगीत
शरद पवारांनी घेतलेला हा निर्णय पक्षासाठी आतबट्ट्याचा तर नव्हे, शरद पवारांना आपल्या पक्षाला भाजपासोबत तर पाठवायचं आहे, अशा एक ना अनेक तर्कावर आधारलेल्या चर्चा या तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्या. 2024 च्या निवडणुका जवळ आलेल्या असताना शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, हे अनेकांच्या पचणी पडत नव्हते. जे शरद पवार वयाच्या 80 व्या वर्षात भर पावसात सभा घेऊन महाराष्ट्राचं वारं पलटवू शकतात, जे शरद पवार अशक्य ते शक्य करून दाखवू शकतात त्या शरद पवारांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवृत्तीचा निर्णय घेणे म्हणजे त्या मागे नक्कीच काय तरी कारणे तेही भारतीय जनता पार्टीला मदत होईल, असे. हे तर्क अनेकांनी काढले. परंतु शरद पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत जोडण्यापेक्षा जे भाजपा सोबत जोडले जाण्याची शक्यता आहे अशांना चपराक देण्याइरादे घेतलेला हा निर्णय महत्वपुर्ण मानला जातो. शरद पवार ही एक अशी हस्ती आहे, एक तर ते आपल्या विरोधकांना पाहिजे ते तात्काळ देतात आणि त्यातून रोपट्याला कलम केल्यागत राजकीय नवी जात निर्माण कशी होईल याकडे लक्ष देतात. नाही तर शरद पवार हे विरोधकांना पाहिजे ते घेत असतील अन् ते पवारांना द्यायचे नसेल तर शरद पवार असा काही निर्णय घेतात, देणारालाही देता येत नाही अन् घेणारालाही घेता येत नाही, तसाच काहीसा निर्णय शरद पवारांनी राजीनाम्याचा घेतला. अजित पवारांनी जी अस्थिरता निर्माण केली त्या अस्थिरतेमुळे शरद पवारांच्या
धर्मनिर्पेक्षतेला धोका
निर्माण झाला. पक्षाच्या स्थापनेपासून भाजपसोबत न गेलेल्या पवारांवर भाजपसोबत चलण्याचा सर्वाधिक दबाव आज पक्षातूनच आहे. त्याचवेळी भाजपसोबत जाऊ नये, असे मानणारेही काही नेते आहेतच. त्यांच्यापैकी कोणाच्या बाजूने कौल द्यावा ही खरी कोंडी आहे. वैचारिकतेची कास कायम ठेवायची की सत्तेसाठी व्यवहारवाद स्वीकारायचा याचा फैसला करायचा आहे. तीन-चार महिन्यांत तो करावाच लागेल. पक्षाध्यक्षपद सोडण्याची घोषणा करून शरद पवार यांनी अजित पवार यांची कोंडी केल्याचा तर्क काही जण लावत आहेत. घोषणेनंतर भावनांचा जो बांध फुटला त्यातून पक्ष माझ्या सांगाती’ हे दाखवून देण्यात साहेब यशस्वी झाले असले तरी सगळे बेंबीच्या देठापासून आर्जव करत असताना अजित पवार मात्र ’नवीन अध्यक्ष आले तर काय हरकत आहे?’ असा सूर लावत होते. पुतण्याचा हा सूरच काकांसाठी मोठी डोकेदुखी आहे आणि राहील. भावनाविवश झालेल्या नेत्यांची ताकद एकत्र केली तरी अजित पवारांची ताकद अधिक आहे. भावना अनावर झालेल्यांपैकी बरेच जण अजितदादांसोबत आहेत. इतकी वर्षे धर्मनिरपेक्ष नेता ही प्रतिमा टिकवणार्‍या पवारांना आयुष्याच्या संध्याकाळी भाजपसोबत जायचे नाही आणि पक्षातील फूटही टाळायची आहे. त्यासाठी हरेक प्रयत्न ते करत आहेत हा त्यांच्या राजीनाम्याचा अर्थ मानला तर ते चुकीचे ठरणार नाही. शरद पवार आणि
‘लोक माझ्या सांगाती ’
हे एकच मानलं जातं. कारण पवारांच्या उभ्या आयुष्यावर ‘लोक माझ्या सांगाती’तून प्रकाश टाकला आहे. परंतु आम्ही इथेही लोक माझ्या सांगातीत संपुर्ण शरद पवार आलेत काय? कारण बुद्धी आणि तर्काच्या जोरावर जे लोक निर्णय घेतात ते सातत्याने हातचे राखून ठेवतात. परंतु जे काही लोक माझ्या सांगातीत आले आहे ते पाहिल्यानंतर शरद पवार हे कोणाच्याच हाताला लागले नाहीत. ते पुतण्याच्या हाती कठपुतली कसे होतील? असे वक्तव्य एका विश्वलेषकाने केले ते सत्य मानले पाहिजे. शरद पवार हे महाराष्ट्रासाठीच नव्हेतर देशासाठी एक महत्वाचे नेते आहेत. त्यांची निवृत्ती ना महाराष्ट्राला परवडणारी, ना देशाला परवडणारी. म्हणूनच पक्षातील समर्थकांसह विरोधी पक्षातल्या अनेक बड्या नेत्यांनी राजीनाम्यावर फेरविचार करण्याबाबत शरद पवारांशी चर्चा केल्याचे पक्षाकडून सातत्याने सांगण्यात येते. शरद पवार हे जसे तेल लावलेले पहेलवान म्हणून सुपरिचीत आहेत तसे त्यांच्या राजकारणाचा तळ कोणालाही सापडलेला नाही. याचे ताजे उदाहरण आदानींच्या भेटीवरून उभ्या देशाने पाहिलेले आहे. अशा या राजकारणातील भिष्माचार्याची गरज आणि फुटीरवाद्यांसाठी समज पवारांकडूनच महत्वाची…! महाभारतात भिष्माचार्य बाणावर राहिले, परंतु इथं शरशय्येवर मी राहणार नाही तर माझ्या मनाविरुद्ध अथवा पक्षाच्या विचारसरणीविरुद्ध जो कोणी जात असेल त्याला नक्कीच शरशय्येवर निजावे लागेल.

उद्याच्या अंकात वाचा
गडावरून उड्या टाकून मरा, नाही तर लढून मरा

Previous Post

केज तालुक्यात पुष्पावर छापा; गावठी कट्ट्यासह एक पिस्टल, चोरीचे चंदन, पंधरा जिवंत काडतूस, दोन लोखंडी कोयते, एक रामपूरी चाकू जप्त

Next Post

उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड रूजू

संबंधित बातम्या

‘मी थांबणार नाही, झुकणार नाही…; पंकजा मुंडेंनी जाहीर केली भूमिका
Uncategorized

‘मी थांबणार नाही, झुकणार नाही…; पंकजा मुंडेंनी जाहीर केली भूमिका

by Beed Reporter
June 3, 2023
जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पंचायत राज समिती जिल्हा दौर्‍यावर
Uncategorized

अखेर माफीनामा दिलेल्या त्या 54 शिक्षकांना पदस्थापना

by Beed Reporter
June 2, 2023
विशेष संपादकीय…
Uncategorized

अग्रलेख- तुका म्हणे, शिंदळीच्या व्यर्थ श्रमविली वाचा बोल बजगरं बली की जय..!

by Beed Reporter
May 14, 2023
केज तालुक्यात पुष्पावर छापा; गावठी कट्ट्यासह एक पिस्टल, चोरीचे चंदन, पंधरा जिवंत काडतूस, दोन लोखंडी कोयते, एक रामपूरी चाकू जप्त
Uncategorized

केज तालुक्यात पुष्पावर छापा; गावठी कट्ट्यासह एक पिस्टल, चोरीचे चंदन, पंधरा जिवंत काडतूस, दोन लोखंडी कोयते, एक रामपूरी चाकू जप्त

by Beed Reporter
May 6, 2023
थोरल्या क्षीरसागरांचा पाल उठला; पुतण्याचा डंका; 30 वर्षांची मक्तेदारी मोडीत
Uncategorized

थोरल्या क्षीरसागरांचा पाल उठला; पुतण्याचा डंका; 30 वर्षांची मक्तेदारी मोडीत

by Beed Reporter
April 29, 2023
Next Post
45 हजार फार्मासिस्ट मतदारांचे चुकीचे पत्ते, निवडणूक रद्द करण्याची केली मागणी

उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड रूजू

ताज्या बातम्या

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

March 12, 2026

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

March 6, 2026

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

March 5, 2026

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

March 4, 2026

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

March 3, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू
  • मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
  • पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?