बीड (रिपोर्टर) शहागड येथील नवरा-बायकोमध्ये नेहमीच वाद होत होते. या वादातून दोन मुलींना उंदीर मारण्याचे औषध पाजण्यात आले. दोन दिवस गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर या मुलींची प्रकृती गंभीर झाल्याने काल त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र उपचार घेत असतानाच एका सात वर्षीय श्रेया नावाच्या मुलीचा मृत्यू झाला तर दुसरी दोन वर्षाची मुलगी गंभीर आहे.
शहागड येथील मनिषा आणि कृष्णा पंडित या नवरा-बायकोमध्ये पत्नीचे कुठे तरी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून नेहमीच वादविवाद होत असे. त्यातच 8 मे रोजी त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. त्यातून नवरा म्हणतो, पत्नीने मला शिवीगाळ करून दोन्ही मुलींसह मला उंदिर मारण्याचे औषध पाजले तर पत्नी म्हणते की, नवर्याने मला मारहाण करून दोन मुलींना विष पाजून तो स्वत:हू विष पेयला. या तिघांनाही गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. 9 आणि 10 हे दोन दिवस गेवराई येथे उपचार करून दहा तारखेला रात्री बीड जिल्हा रुग्णालयात मुलींसह कृष्णा पंडित यांना उपचारासाठी आणण्यात आले. त्यात 7 वर्षीय श्रेया हिची प्रकृती गंभीर होऊन आज सकाळी तिचा मृत्यू झाला. दुसरी दोन वर्षे वयाची शिवाज्ञी हिची प्रकृती गंभीर आहे. तर कृष्णा पंडित याच्यावरही जिल्हा रुग्णालयाच्या वार्ड क्र. 6 मध्ये उपचार सुरू आहेत. गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सानप आणि सहायक पोलीस निरीक्षक राऊत यांनी जिल्हा रुग्णालयात येत पत्नी मनिषा हिच्या जबाबावरून कृष्णा पंडित याच्याविरुद्ध कलम 306 नुसार गुन्हा दाखल केला असून त्याला कागदोपत्री ताब्यात घेतले आहे मात्र पती-पत्नीच्या भांडणामध्ये हकनाक मुलीला जीव गमवावा लागला. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.