अवघ्या 3 महिन्याची मुलगी अनाथ
आष्टी ( रिपोर्टर):-तालुक्यातील वाघळुज येथील पती पत्नी ने सायंकाळी शेतात कांदे झाकण्यासाठी गेले असता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे.ईश्वर गुंड आणि ऋतुजा गुंड असे मृत पती पत्नीचे नाव आहे.याबाबत अंभोरा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की वाघळुज येथील ईश्वर लक्ष्मण गुंड वय 30 वर्ष व पत्नी ऋतुजा ईश्वर गुंड हे पती पत्नी सायंकाळी शेतात कांदे झाकण्यासाठी गेले होते.ते परतलेच नाहीत म्हणून नातेवाईकांनी रात्री शोध सुरू केला तेव्हा ईश्वर गुंड याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला तर ऋतुजा शोध उशीरा लागला तिचा ही मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला त्यांना अवघ्या 3 महिन्याची मुलगी आहे.या हृदय दावक घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित बेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.आर तांदळे,बी.एल माने, पोलिस उपनिरीक्षक भडके यांनी घटनास्थळी पाहणी केली असून अधिक तपास सुरू आहे.कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले असून दुपारी 1 वाजता वाघळुज या ठिकाणी दोघांवरती शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.