आ.संदीप क्षीरसागरांनी मानले पोलीस अधीक्षक
नंदकुमार ठाकूर व पोलीस विभागाचे आभार
बीड (रिपोर्टर):- शहरातील दिप हॉस्पिटल समोरून जाणार्या डी.पी. रस्ता व नालीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र या रस्त्याच्या पुढच्या टप्प्यात पोलीस विभागाची जागा येत असल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. परंतु या विषयामध्ये आ.संदीप क्षीरसागर यांनी पोलीस विभागाशी चर्चा करून मार्ग मोकळा केला.
शहरातील दिप हॉस्पिटल ते रिपोर्टर भवन रस्ता व नालीकाम, महाराष्ट्र नगरोत्थान योजनेतंर्गत मंजूर आहे. या रस्ता कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. जिल्हा रूग्णालयाच्या संरक्षण भिंतीचे काम पूर्णत्वास आलेले आहे. मात्र याठिकाणी पोलीस विभागाच्या मालकीची जागा असल्यामुळे या कामाला तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी शनिवार (दि.24) रोजी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याशी चर्चा करून
या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली व कामासाठी योग्य ते सहकार्य करून मार्ग काढण्याची विनंती केली. यावर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. या कामासाठी सहकार्य केल्याबद्दल आ.संदीप क्षीरसागर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व प्रशासनाचे आभार मानले आहेत.