Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडरेल्वे कृती समितीने रेल्वेचे केले प्रतिकात्मक उद्घाटन

रेल्वे कृती समितीने रेल्वेचे केले प्रतिकात्मक उद्घाटन


कलेक्टर कचेरीपर्यंत इंजिन नेलं वढत; बीडला रेल्वे येते की नाही?
बीड (रिपोर्टर)- परळी-बीड-नगर रेल्वे मार्ग अद्यापही पूर्ण झाला नाही. आतापर्यंत अनेक निवडणुका झाल्या, कित्येक वेळा आश्‍वासने दिली गेली मात्र रेल्वेचं इंजिन काही धावलं नाही. रेल्वे कृती समितीने आज आगळंवेगळं आंदोलन करून बीडकरांचे लक्ष वेधून घेतले. प्रतिकात्मक रेल्वेचं उद्घाटन करत प्रतिकात्मक रेल्वेचं इंजिन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ओढत नेलं. या वेळी विविध पक्ष, संघटनेचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.


नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी अनेक वेळा आंदोलने झाली. आतापर्यंत अनेक आश्‍वासनाच्या खैराती वाटण्यात आल्या परंतु अद्यापही राजकारण्यांना बीडला रेल्वे आणता आलेली नाही. 2019 च्या निवडणुकीत रेल्वे येईल, असे ठाम आश्‍वासन त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी दिले होते. आता 2024 ची निवडणूक येत आहे तरीही रेल्वेबाबत निश्‍चित काही सांगता येत नाही. आज विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीच्या वतीने आगळंवेगळं आंदोलन करण्यात आलं. रेल्वेचे प्रतिकात्मक उद्घाटन करत प्रतिकात्मक इंजिन बनवून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ओढत नेलं. या वेळी विविध पक्ष-संघटनेचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

Most Popular

error: Content is protected !!