Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडजेष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा बीडच्या पहिल्या आमदार शांताबाई कोटेचा यांचे पुणे येथे...

जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा बीडच्या पहिल्या आमदार शांताबाई कोटेचा यांचे पुणे येथे निधन


बीड (रिपोर्टर)- जेष्ठ स्वातंत्र्य सैनानी तथा बीड मतदारसंघाच्या पहिल्या आमदार गांधीवादी नेत्या शांताबाई कोटेचा यांचे आज वृद्धापकाळाने पुणे येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्या 95 वर्षांच्या होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांचे मोठे काम होते. अनेक वेळा त्यांनी जेल भोगले होते. 1942 च्या चले जाव लढ्यात त्या अग्रेसर होत्या. 1957 साली त्या बीडच्या पहिल्या आमदार झाल्या. गांधीवादी विचाराने झपाटलेल्या शांताबाई आज बीड जिल्ह्यासाठी एक इतिहासाचे पान झाले.


स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीवादी विचाराने झपाटलेल्या अनेक स्वातंत्र्यवीरांचा इतिहास अंगावर शहारे आणणारा आहे. बीड जिल्ह्यातही असे अनेक स्वातंत्र्यवीर निपजले आणि त्यांनी शौर्य गाजवले. कोटेचा परिवारही असाच धगधगता निखारा म्हणावा लागेल. जेष्ठ स्वातंत्र्य सैनानी रतनलालजी कोटेचा आणि हिरालाल कोटेचा हे बीडमधील मोठे प्रस्थ. हिरालाल चौक हे नाव हिरालाल यांच्या नावावर असून याच घरातील शास्त्रज्ञ असलेले सुभाष कोटेचा यांचे अकाली निधन झाल्याने बीडच्या सुभाष रोडला त्यांचे नाव देण्यात आली. आज याच घरातील स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांशी आणि निजामाशी झगडणारा निखारा विझला. जेष्ठ स्वातंत्र्य सैनानी, गांधीवादी नेत्या तथा बीडच्या पहिल्या आमदार शांताबाई रतनलालजी कोटेचा यांचे आज पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. इ.स. 1957 साली त्यांनी बीड विधानसभा(पान 7 वर)
मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि त्या आमदार झाल्या. तत्पूर्वी 1952 साली त्यांनी पहिली बीड नगरपालिकेची निवडणूक लढविली होती. नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारण करण्याचे ठरवले. त्यापूर्वी शांताबाई यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांशी लढा देण्यासाठी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. 28 एप्रिल 1926 चा जन्म असणार्‍या शांताबाईंना वयाच्या 16 व्या वर्षी सर्वप्रथम त्या कारागृहात गेल्या. 9 ऑगस्ट 1942 च्या चले जाव आंदोलनात त्यांनी अग्रेसर भाग घेतल्यानंतर त्यांना अटक होऊन 4 महिन्याची शिक्षा झाली. ती शिक्षा त्यांनी येरवडा कारागृहात भोगली. शांताबाई कोटेचा गांधीवादी विचाराच्या नेत्या म्हणण्यापेक्षा समाजसेवक होत्या. त्यांचे आज निधन झाले. आजच्या राजका-रणाबद्दल पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच राजकारणाचे सूत्र असल्याचे त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

Most Popular

error: Content is protected !!