बीड (रिपोर्टर):- मामला तलवात एका जीसीबी व एक हायवा टिप्पर वाहनात अवैद्य रित्या गौणखनिज मुरुम उत्खनन करुन वाहतुक करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक केज व अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांना मिळाल्यानंतर पथकातील दोन आधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन धाड टाकत जीसीबी व टिप्पर हायवावर कार्यवाही केली आहे. विशेष म्हणजे हि कार्यवाही काल रविवार रोजी सायं.5 वाजण्याच्या सुमारास केली आहे.
वडवणी शहरापासून जवळच असणाऱ्या मामला तलवात एका जीसीबी व एक हायवा टिप्पर अवैद्यरित्या गौणखनिज मुरुम उत्खनन करुन वाहतुक करत आसल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना मिळाली व त्यांनी पोअ/661 कानताडे, पोअ/2299 थापडे भ्रमणध्वनीद्वारे कळवून घटनास्थळी जाऊन कार्यवाही करावी असे आदेशित केल्यानंतर सदरील आधिकारी यांनी घटनास्थळी काल सायं 5 वाजण्याच्या सुमारास पोहच होत त्यांना एक जीसीबी मशिन क्रं. चक38 त2675 यांचा चालक गोंविद अशोक लांडे वय 25 वर्ष रा.कदमवस्ती वडवणी व हायवा टिपर क्रं. चक21 इक3304 यांचा चालक कैलास प्रल्हाद जेधे वय 39 वर्ष रा.बाहेगव्हाण असे नाव असून सदरील दोन्ही वाहने सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने वडवणी पोलीस स्टेशनला लावून प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे वडवणी यांनी सदरचे वाहनावर वडवणी तहसीलदार यांच्यामार्फत रीतसर गौण खनिज व इतर कायद्यान्वये रीतसर कारवाई करण्याचे आदेशित केलेले आहे. व सदरील रिपोर्ट एस.ए. तपसे पोलीस उपनिरीक्षक वन उपविभाग पोलीस अधिकारी माजलगाव यांना देण्यात आला आहे.तर सदरील कार्यवाही हि काल रविवार रोजी सुट्टीच्या दिवशी केली आहे. विशेष वडवणी येथील अवैद्य गौणखनिज उत्खन्न करत असल्याची माहिती डँशिंग पोलीस आधिकारी पंकज कुमावत यांना माहिती होते परंतु वडवणी येथील महसुल व पोलीस प्रशासनाला होत नाही हे विशेष .