बीड (रिपोर्टर) :-दारु पिण्यासाठी पैसे दिले नसल्याच्या रागातून एकावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले. ही घटना उमरद जहाँगीर येथे 22 जुलै रोजी घडली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवराज चंदन आहेर असे जखमी झालेलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने बीड ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातीलच दादासाहेब शहादेव आहेर याने दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र युवराज आहेर याने त्याला दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला. नकार देता शिवीगाळ करुन मानहान केली. त्यानंतर युवराज आहेर हा रस्त्याने पुढे जात असतांना आरोपी दादासाहेब आहेर यांनी पाठीमागून येवून कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने मारहान करत जिवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास बीड ग्रामीण पोलिस करत आहेत.