किल्ले धारूर (रिपोर्टर)ः-धारूर शहर आज मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ कडकडीत बंद करण्यात आले सकाळपासूनच सकल मराठा समाजाच्या सर्व कार्यकर्ते तसेच शहरातील सर्व मराठा प्रेमींनी शहरातून रॅली काढत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले .या आव्हानाला प्रतिसाद देत सर्व व्यापार्यांनी आज आपले व्यवहार बंद ठेवले. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मराठा आंदोलकांवर लाठी चार्ज करण्यात आला यामुळे बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.
या हाकेला प्रतिसाद देत धारूर शहर आज कडकडीत बंद ठेवण्यात आले सकल मराठा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मराठा समाज बांधवांनी शहरातून फेरी काढत सर्वांना दुकाने बंद ठेवण्याच्या वाहन केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत आज धारूर शहरातील सर्व दुकाने बंद होती यानंतर शिवाजी चौकामध्ये तब्बल दोन तास या शासनाच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या धारूर बंदला मुस्लिम समाज तसेच इतर समाजातील बांधवांनी पाठिंबा दिला फेरीमधून शासनाचा सर्वात परी निषेध व्यक्त करण्यात आला अशा प्रकारच्या घटना या माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.