Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडबीड येथे व्यापार्‍यांचा मेळावा सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे होणार मार्गदर्शन

बीड येथे व्यापार्‍यांचा मेळावा सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे होणार मार्गदर्शन

बीड (रिपोर्टर)- बीड जिल्हा व्यापारी संघाच्या वतीने मार्गदर्शन शिबीर आयोजीत करण्यात आले असून या शिबीरामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी हजेरी लावणार आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी, विनोद पिंगळे, विनोद ललवाणी यांनी केले आहे.
   17-10-2021 रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मार्फत बीड जिल्हा मार्गदर्शन शिबीर आयोजीत करण्यात आले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टचे राज्य उपाध्यक्ष अरुण बरकसे उपस्थित राहणार आहेत. या वेळी सय्यद हाशमी (सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन, बीड), राजगोपाल बजाज (सह आयुक्त, अन्न प्रशासन बीड जिल्हा), निखिल कुलकर्णी (अन्न सुरक्षा अधिकारी हे मार्गदर्शन करणार असून मनोहर कलंत्री (राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया अ‍ॅग्रो इनपुट डिलर असो. नवी दिल्ली संचालक नवी दिल्ली), इंजि. अजय अर्जुनराव जाहेर पाटील (अध्यक्ष, शाहू अर्बन को. ऑप. बँक), जवाहरलाल कांकरिया, अशोक शेटे, संदीप लाहोटी, नंदूशेठ बियाणी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. दरम्यान कॉन्फ्रेडशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स कॅट दिल्ली या संघटनेचे प्रतिनिधी शहरात येत असून त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहर कलंत्री राहणार असून कार्यक्रमाला मार्गदर्शन महेशभाई बखाई (महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी), सचिनभाऊ निवंगुणे (संयुक्त महामंत्री), शंकरभाई ठक्कर (मुंबई महानगर अध्यक्ष तसेच राष्ट्रीय खाद्य तेल अध्यक्ष), सी.ए. भानुदास जाधव (उद्योजक तथा सदस्य सीसीआय समन्वय समिती), सी.ए. गोपाळ कासट (अध्यक्ष, चार्टड अकाऊन्टंट बीड जिल्हा), प्रमुख उपस्थिती अरुण बरकसे, इंजि. अजय अर्जुन जाहेर पाटील, ज्ञानोबा माऊली फड, अनंत दादा रुद्रवार, राजेंद्र मुनोत उपस्थित राहणार आहेत. दरम्यान हा मेळावा 17 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता महा वैष्णव पॅलेस एमआयडीसी बीड या ठिकाणी होत आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया क्रेडर्स कॅट दिल्लीचे जिल्हाध्यक्ष  विनोद पिंगळे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष विनोद ललवाणी यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!