Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडरामेश्‍वर नरवडे यांचा अपघाती मृत्यू पिंपळनेरमध्ये हळहळ

रामेश्‍वर नरवडे यांचा अपघाती मृत्यू पिंपळनेरमध्ये हळहळ

पिंपळनेर (रिपोर्टर)- घाटसावळीकडून पिंपळनेरकडे येत असताना मोटारसायकलच्या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रात्री पिंपळनेरपासून काही अंतरावर घडली. या अपघातात रामेश्‍वर नरवडे (वय 48 वर्षे) यांचे दुर्दैवी निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत अधिक असे की, पिंपळनेर येथील कृषी दुकानदार रामेश्‍वर नरवडे हे घाटसावळीकडून पिंपळनेरकडे येत होते. वाटेत त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. त्यांना बीड येथील काकु-नाना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचार घेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी पिंपळनेर येथे त्यांच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रामेश्‍वर नरवडे यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या पश्‍चात आई-वडिल, पत्नी, मुलगा-मुलगी, असा परिवार आहे. नरवडे परिवाराच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे. 

Most Popular

error: Content is protected !!