बीड (रिपोर्टर)- हॉटेलमध्ये काम करणार्या एका 30 वर्षीय तरुणाचा हातगाड्यावर मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तरुणाच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.
चंद्रकांत बरकसे (वय 30 वर्षे, रा. गोटेगाव) हा तरुण हॉटेलमध्ये काम करून आपली उपजिविका भागवत होता. रात्री तो तहसील कार्यालयासमोरील हातगाड्यावर झोपला होता. सकाळी तो मृतावस्थेत आढळून आला. या बाबतची माहिती पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तरुणाच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.