वडवणी (रिपोर्टर):- वडवणीहून चिंचोटीकडे जात आसलेल्या दुचाकीला पाठीमागून येत असलेल्या भरधाव ट्रकने कट मारल्याने दुचाकीवरील उच्चशिक्षित 22 वर्षीय तरुणी जागीच ठार झाली आहे.हि घटना आज सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आंधळे पेट्रोल पंपा जवळ घडली असुन या घटनेन हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत आधिक माहिती अशी की, चिंचोटी येथील रहिवाशी असलेले शेतकरी शेषनारायण गोंडे यांची मुलगी स्वाती गोंडे हिचा एम फार्मशीसाठी सातारा येथील काँलेजला नंबर लागला होता. या शिक्षणाला खर्च येत असल्यामुळे लेक आणि बाप हे वडवणी येथील शासकिय एसबीआय बँकेत कर्ज प्रकरणासाठी आले होते. तर बँकेतील आधिकारी शेत व घराची पाहणी करण्यासाठी जात आसताना आंधळे पेट्रोल पंपाजवळ गेले आसता पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रक एमएच 16 एवाय 8567 या गाडीने दुचाकीला (नंबर उपलब्ध झाला नाही ) पाठीमागून जोराची धडकी दिली.यामध्ये स्वाती शेषनारायण गोंडे वय 22 वर्ष या उच्चशिक्षित तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.तर ट्रक पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.तर मृत स्वाती हिचा मृतदेह जिल्हा रुग्णालय बीड येथे श्वविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. तर या घटनेन चिंचोटी ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.