पुणे (रिपोर्टर)- राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यापासून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होणार का? अशी चर्चा सुरु होती. अखेर त्यावर काल (बुधवारी) शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. भाजपला पुणे शहरासह ग्रामीण भागात पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी पालकमंत्रीपद महत्त्वाचे असतानाही राजकीय वाटाघाटीत भाजपने एक पाऊल मागे घेत चंद्रकांत पाटील यांच्याकडील हे पद पवार यांना बहाल केले. तर चंद्रकांत पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्रीपद देण्यात आले.
दरम्यान अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाहीर झाल्यानंतर आज अजित पवार पुन्हा क्टिव्ह मोडवर दिसून येत आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत आज दुपारी 3 वाजता मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये अजित पवार बैठक घेणार आहेत.गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांना थ्रोट इन्फेक्शन असल्यामुळे अजित पवारांनी कोणाचीही भेट घेतली नव्हती. परंतु, ते बैठकीला देखील गैरहजर होते. त्यांच्या या गैरहजेरीनंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या होत्या.तर आज अजित पवार पुन्हा क्टिव्ह मोडमध्ये दिसत आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत दुपारी 3 वाजता मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये अजित पवार बैठक घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना पुन्हा एकदा पुर्णविराम मिळाला आहे. ते आजारी असल्याने बैठकांना गैरहजर होते. मात्र, ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळताच धनंजय मुंडेंचा कामांचा धडाका
बीड (रिपोर्टर)- कृषिमंत्री धंनजय मुंडे यांची आजच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली असून, पहिल्याच दिवशी धनंजय मुंडेंच्या कामांचा धडाका आज पाहायला मिळाला आहे.
बीड येथील मुख्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 30 कोटी 95 लाख तर सामाजिक न्याय विभागांतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून बीड येथे मुलांचे वसतिगृह उभारण्यास 9 कोटी 99 लाख रुपये इतक्या रकमेच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 16 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या कामांना मान्यता देण्यात आली होती. तर सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेचे जनकच धनंजय मुंडे हे आहेत. दरम्यान परळी येथील कृषी महाविद्यालय, सोयाबीन संशोधन केंद्र त्यापाठोपाठ आता बीड येथील प्रशासकीय इमारत व ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वसतिगृहाचा विषय मार्गी लागल्याने नव्याने पालकमंत्री म्हणून पुन्हा निवड झालेल्या धनंजय मुंडे यांच्या कामाचा उरक पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे.