Sunday, January 23, 2022
No menu items!
HomeUncategorizedकुमावत यांची वाळूवर धाड तिन ट्रॅक्टर,२५ ब्रास वाळू जप्त

कुमावत यांची वाळूवर धाड तिन ट्रॅक्टर,२५ ब्रास वाळू जप्त


कुक्कडगांव (रिपोर्टर)ः- अप्पर पोलीस अधिक्षक कुमावत हे अवैध धंद्यावर धाडी टाकत असल्याने अवैध धंद्यावाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले. आज पहाटे कुक्कडगांव परिसरातील अवैधरित्या वाळू घेवून जाणार्‍या तिन वाहनांवर त्यांनी कारवाई केली. तिन ट्रॅक्टरसह २५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. यावेळी महसूल विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते.


कुक्कडगांव परिसरातून नेहमीच अवैध वाळूचा उपसा सुरू असतो. या परिसरातील वाळू माफीयांवर कठोर कारवाई होत नाही. आज पहाटे अतिरिक्त पोलीस अधिक्षक कुमावत यांनी बर्‍हाणपूर परिसरात धाड टाकली त्याठिकाणी त्यांना तिन ट्रॅक्टर, २५ ब्रास वाळू आढळून आली. ट्रॅक्टरसह वाळू जप्त करण्यात आली. सदरील कारवाईच्या वेळी तहसिलदार सुरेंद्र डोके, एपीआय आघाव, मंडळ अधिकारी नितीन जाधव,तलाठी खिंड्रे, गुरसाळी, सोनवणे, चांदणे, कारले, विघ्ने, यांची उपस्थिती होती. या प्रकरणी पिंपळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध धंद्यावाल्याचे चांगलेच धाबे दणाणले.

वडवणीतही कारवाई
कुमावत यांनी बीड तालुक्यात येऊन पिंपळनेर हद्दीत वाळुच्या ट्रॅक्टरवर कारवाई केल्यानंतर परत जाताना चिंचवण फाट्याजवळ एक अवैध ट्रॅक्टर वाळु घेऊन जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाठलाग करून सदरील ट्रॅक्टर वडवणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Most Popular

error: Content is protected !!