Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडभाजप आणि कॉंग्रेसला स्वत:ची विचारधारा नाही -राजीवसिंह कुशवाह

भाजप आणि कॉंग्रेसला स्वत:ची विचारधारा नाही -राजीवसिंह कुशवाह


बीड (रिपोर्टर)- आताची कॉंग्रेस ही नेहरू-गांधींची कॉंग्रेस राहिलेली नाही. आताच्या भाजपामध्ये कॉंग्रेसमधील शंभर ते दीडशे नेते आहेत. त्यामुळे भाजप आणि कॉंग्रेस हे एकच आहेत. लोकांना वेडात काढण्याचे काम दोघेही करत आहेत. पाच-दहा वर्षे भाजप आणि कॉंग्रेस आलटून पलटून सत्ता भोगतात. अखिल भारतीय परिवार पार्टी येणार्‍या २०२४ ला संपुर्ण देशात लोकसभेचे उमेदवार देणार असून पुर्ण ताकतीने परिवर्तन घडवून आणणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय परिवार पार्टीचे अध्यक्ष राजीवसिंह कुशवाह यांनी दिली. ते बीड येथे आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

सत्तेत येण्यापुर्वी राजकीय लोक मोठमोठ्या घोषणा देतात मात्र त्यानंतर त्यांना त्याचा विसर पडतो, आम्ही निवडणूक लढवण्यापुर्वी आमचा जाहीरनामा तयार करणार (पान ७ वर)
आहोत आणि तो लिगली कागदावर असेल. जे आश्‍वासन दिले त्याची पुर्तता न झाल्यास नागरिकांनी आम्हाला कोर्टात खेचावे, आम्ही जनतेला जागृत करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राजनैतिक क्रांतीचे रुप घेतले आहे. या राजनैतिक क्रांतीद्वारे देशातील सर्व राज्यात पाचसुत्री कार्यक्रम राबविणार आहोत. यामध्ये राजनितीक सुधारणा, शिक्षा व आरोग्य सेवेमध्ये सुधारणा, शेतकर्‍यांचे सशक्तीकरण, व्यापार, वाणिज्य व कर नीतीमध्ये सुधारणा आणि सशस्त्रबलमध्ये सुधारणा करणार आहोत, असेही ते या वेळी म्हणाले. या वेळी राष्ट्रीय मुख्य महासचिव कृष्णेंदू चटलजी आणि महाराष्ट्र प्रदेश प्रभारी कलीम जहॉंगीर यांची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!