Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडजनाधार पॅनल प्रचंड मताधिक्याने विजयी होणार-ऍड.शहाजीराव जगताप

जनाधार पॅनल प्रचंड मताधिक्याने विजयी होणार-ऍड.शहाजीराव जगताप


बीड (रिपोर्टर)ः- श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप.बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मेळाव्याचे आयोजन शिवाजीनगर आणि मोंढा भागात करण्यात आले होते. सदर मेळाव्यास संबोधीत करत असताना ते म्हणाले की, शाहू बँक ही सहकार क्षेत्रातील मराठवाड्यातील नामांकित बँक आहे. बँकेने सर्वच क्षेत्रात प्रगती केली असून बँक स्थापनेपासून सातत्याने नफ्यात आहे. सभासदांना नियमीतपणे लाभांश वाटप करणारी ही बँक आहे. बँकेस सतत अ दर्जा प्राप्त झालेला असून दरवर्षी वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित होणारी आपली बँक आहे. बँकेच्या स्थापनेपासून संचालक मंडळाचा स्वच्छ व पारदर्शी कारभार आहे. सभासदांचा अढळ विश्वास विद्यमान संचालक मंडळावर आहे. त्यामुळे सभासद जनाधार पॅनलच्या सर्व उमेदवारांना ढाल-तलवार या चिन्हावर मतदान करुन प्रचंड मताने विजयी करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बीड येथील मोंढा भागात सभासदांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर विद्यमान अध्यक्ष इंजि.अजय पाटील, ऍड.सत्यनारायण लोहिया, रावसाहेब आगळे, प्रा.नारायणराव मस्के, ऍड.पांडुरंगराव भोसले, प्रा.विक्रमराव जाधव, इंजि.प्रकाशराव भांडेकर, श्रीरंगराव गोरकर, बलभीराव कुटे, निलेश लोढा, इंजि.अभय कदम, रामहरी गव्हाणे, बंडोपंत कुलकर्णी, बद्रीनारायण जाजु यांचेसह व्यापारी-सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, बँकेच्या ४६ शाखा असून संपुर्ण महाराष्ट्र कार्य क्षेत्र आहे. बँकेच्या

माध्यमातुन सुमारे ५०० कर्मचारी यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. बँकेचे कर्मचारी सभासदांना नम्रपणे सेवा देत आहेत. हजारो युवकांना वित्तीय सहाय्य देवून स्वतःच्या पायावर ताट मानेने उभे केले आहे. सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून संचालक मंडळ अविरतपणे कार्य करत आहे. बँकेचे संस्थापक अध्यक्ष कै.इंजि.अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या दुखःद निधनानंतर,संचालक मंडळाने बँकेची धुरा त्यांचे सुपुत्र इंजि.अजय पाटील यांच्यावर एकमताने सोपवली. त्यांचे कार्यकाळातही बँकेने प्रगतीचा आलेख कायम ठेवला. कै.आप्पासाहेब जाहेर पाटील यांनी घालुन दिलेल्या मार्गाने विद्यमान संचालक मंडळ कार्य करत आहे. त्यामुळे सभासद विद्यमान संचालक मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
यावेळी बँकेचे विद्यमान अध्यक्ष इंजि.अजय पाटील यांनी बँकेच्या प्रगतीचा सविस्तर अहवाल सभासदांसमोर मांडला. बँकेच्या स्थापनेपासून दरवर्षी नफ्यात असणारी आणि नियमीतपणे पुरस्कारास प्राप्त ठरणारी आपली बँक आहे. मराठवाड्यातील नामांकित सहकारी बँक म्हणून आपल्या बँकेचा नावलौकिक आहे. बँकेच्या प्रगतीमध्ये सभासदांचे अमुल्य असे योगदान आहे. सभासदांना, अद्यावत सेवा देण्याच्या हेतूने एटीएम, युपीआय, फोन-पे, गुगल-पे, बँकींगची सुविधा संचालक मंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. कोव्हीड -१९ च्या प्रतिकुल परिस्थितीमध्ये बँकेने प्रगतीचा आलेख कायम ठेवला आहे. तशा परिस्थितीमध्येही बँकेच्या ठेवी आणि कर्ज वितरण वाढले असून बँकेचा नेट एन.पी.ए. १%पेक्षा कमी आहे. हे सर्व सभासदांच्या विश्वासामुळे आणि सहकार्यामुळेच शक्य झाले आहे. सभासदांच्या हिताला बाधा येईल असे कोणतेही कृत्य संचालक मंडळाच्या हातुन होणार नाही याची पुर्ण ग्वाही त्यांनी दिली. विरोधकांनी वैयक्तीक हेवेदाव्यातून निवडणुक लादली आहे. त्यांचेकडे बँकेच्या प्रगतीचा कोणताही अजेंडा नसल्यामुळे, विरोधक माझे वडीलांचा फोटो वापरुन सभासदांची सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सभासद त्यांना त्यांची जागा दाखवुन देतील असा मला पुर्ण विश्वास आहे. तरी येत्या निवडणुकीमध्ये जनाधार पॅनलच्या ढाल-तलवार या चिन्हावर मतदान करुन सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी ऍड.सत्यनारायण लोहिया यांनीही बँकेच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती देवून,सभासदांनी जनाधार पॅनलच्या पाठीशी आपली सर्व शक्ती उभी करावी असे आवाहन केले. यावेळी मदनलाल अग्रवाल, विजय लाहोटी, ज्ञानदेव डाके, विष्णु तांदळे यांनी समयोचित भाषणे केली आणि सर्व सभासद जनाधार पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. बंडोपंत कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले आणि महादेवराव धांडे यांनी सुत्रसंचालन केले. बलभीमराव कुटे यांनी सर्वांचे आभार मानले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!