केज (रिपोर्टर): मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे राज्यभरात दररोज अनेक सभा घेत आहेत. 12 तारखेला केज तालुक्यातील जवळबण येथे त्यांची सभा होत असल्याने या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे यासाठी बीड शहरातून आज जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत मोठया संख्येने मराठा बांधवांची उपस्थिती होती.
12 डिसेंबर रोजी जवळबन येथे 130 एकरमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा होत आहे. ही सभा सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. सभेची तयारी पुर्ण झाली असून सभेला परिसरातील लाखो मराठा बांधवांनी उपस्थित रहावे यासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला मराठा बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.