गेवराई दि 10 ( वार्ताहार ) उमापुर मधिल साई उमंग मल्टिपर्पज निधी लिमीटेड मुख्य शाखा उमापुर ही बँक (दि 10 रोजी ) मध्यरात्री आज्ञात चोरट्यांनी फोडली असल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,उमापुर चौकीची हाकेच्या अंतरावर ही घटना घडली असल्याने नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे उमापूर चौकीचे कर्मचारी फक्त गोदापात्रातच सक्रीय आहेत भरवस्तीत ही बँक चोरट्यांना फोडण्यात यश आले आहे तसेच चाळीस हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात चोरट्यांना यश आले आहे तसेच ठरल्या प्रमाणे उमापुर पोलिस घटनास्तळावर दाखल झाले होते व या प्रकरणी पुढील तपास सूरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी दिली आहे.