• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

केंद्रातील सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत नाही, त्यांच्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होईल: शरद पवार

by गणेश सावंत
December 11, 2023
Reading Time: 1 min read
0
केंद्रातील सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत नाही, त्यांच्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होईल: शरद पवार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

नाशिक: कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचं पीक आहे. कांदा असं पीक आहे की, त्यामधून दोन पैसे मिळतात. त्यासाठीच शेतकरी कष्ट करतात. पण केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या भावनांची किंमत नाही, अशी खरमरीत टीका शरद पवार यांनी केली. कांदा हे लहान व जिरायती शेतकऱ्यांचं पीक आहे. पण दुर्दैवाने ज्यांच्या हातात देशाचे धोरण ठरवायचे अधिकार आहेत, त्यांच्यादृष्टीने शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळावी, ही भावना नाही. केंद्र सरकारमध्ये बसलेल्या लोकांना ही जाण नसेल तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला. ते सोमवारी चांदवडमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या रास्तारोकोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी शरद पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दुर्दशेसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले. हा एक निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली.

आम्हाला रस्त्यावर बसायची हौस नाही, आम्हाला रास्तारोको करुन लोकांना त्रास द्यायचा नाही. पण हे केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही. कांदा निर्यातबंदीनंतर इतके दिवस राज्यातील सत्ताधारी त्याबद्दल बोलत नव्हते. पण आज चांदवडमध्ये आंदोलन होणार हे कळाल्यानंतर आज सकाळपासून सत्ताधारी नेते आम्ही केंद्राशी चर्चा करणार, असे सांगू लागले आहेत. सध्याचे राज्यकर्ते शेतकऱ्यांसाठी योग्य धोरणं आखणारे नाहीत, अशी टीका शरद पवार यांनी केली.कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरात कांद्याचे दर कोसळले असून कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे.

या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यातील सर्वात अनुभवी आणि शेतीच्या अर्थकारणाची सखोल जाण असलेला नेता म्हणून ओळख असलेले शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. काहीवेळापूर्वीच शरद पवार हे मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको सुरु असलेल्या चांदवडमधील आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या येण्याने येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच थेट रस्त्यावरील लढाईत उतरले आहे. कांद्याचा मुद्दा हा राज्यातील शेतकरी आणि जनतेच्यादृष्टीने महत्त्वाचा असल्याने शरद पवार यांनी कांदा निर्यातबंदीविरोधातील लढाईत घेतलेला सहभाग अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे.कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीपासून मोर्चा काढला. हा मोर्चा आता चौफुली येथे पोहोचला असून याठिकाणी शरद पवार मोर्चेकऱ्यांना येऊन मिळाले. नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाल्याने आंदोलनाच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे. गाडीतून उतरल्यानंतर शरद पवार शेतकऱ्यांच्या याच गर्दीतून वाट काढत व्यासपीठापर्यंत गेले. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी कांदा निर्यातबंदीविरोधातील लढाईत आम्हाला पाठिंबा द्या, अशी विनंती शरद पवार यांना केली.

मात्र, या आंदोलनाच्या निमित्ताने शरद पवार यांच्या गटाला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गट हा सत्तेत सहभागी असल्यामुळे केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीविरोधात या गटातील नेते सावधपणे बोलताना दिसत आहेत. त्याचवेळी शरद पवार मात्र कांदा निर्यातबंदीविरोधातील रस्त्यावरच्या लढाईत उतरले आहेत. शरद पवार यांना राजकारणाचा आणि प्रशासनाचा दीर्घ अनुभव असल्यामळे ते मोर्चात सहभागी झाल्याने कांदा उत्पादकांचा आवाज दिल्लीत केंद्र सरकारपर्यंत पोहोचेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. शरद पवार चांदवडच्या दिशेने येत असताना जागोजागी शेतकरी त्यांना भेटून निवेदनं देत होते. शरद पवार यांनी या प्रकरणात मध्यस्थी करावी आणि कांदा निर्यातबंदीचा निर्णय केंद्र सरकारला मागे घ्यायला लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

Previous Post

ठेवीदारांच्या पैशासाठी मनसेचे धरणे आंदोलन ,बाजार समितीच्या विरोधात कुटुंबियाचे आमरण उपोषण

Next Post

हे अग्रीम आहे, पिकांच्या नुकसानीची अंतिम रक्कमही मिळणार,आतापर्यंत 1600 कोटी अग्रीमचे वाटप, 600 कोटी वाटपाला सुरुवात,कृषीमंत्री धनंजय मुंडेंची विधान परिषदेत माहिती

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
beedreporter update-तुम्ही खरंच राज्याचे एकनाथ आहात. एकनाथामुळे एकी निर्माण होतेय -धनंजय मुंडे

हे अग्रीम आहे, पिकांच्या नुकसानीची अंतिम रक्कमही मिळणार,आतापर्यंत 1600 कोटी अग्रीमचे वाटप, 600 कोटी वाटपाला सुरुवात,कृषीमंत्री धनंजय मुंडेंची विधान परिषदेत माहिती

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?