बीड (रिपोर्टर): बीड नगर परिषदेच्या मालकीचे असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरावस्था झाली असून सदरील नाट्यगृह दुरुस्तीकडे नगरपालिका दुर्लक्ष करीत आहे. नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे.
बीड शहरामध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी भव्यदिव्य स्वरुपात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह उभारण्यात आले मात्र या नाट्यगृहाची सध्या दुरावस्था झाली आहे. या दुरावस्थेकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी नाट्यगृह बचाव समिती पुढे आली असून या समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. या वेळी डॉ. सतीश साळुंके, लक्ष्मीकांत दोडके, कैलास शिंदे, प्रतिक कांबळे, वल्लभ डोंगरे, मुकुंद धुताडमल, ऋषिकेश गिराम, सागर माडेकर यांच्यासह आदींची उपस्थिती आहे.