Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईममारहाणीत जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू, तिघांना घेतले ताब्यात, बीड शहरातील घटना

मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू, तिघांना घेतले ताब्यात, बीड शहरातील घटना


बीड (रिपोर्टर) किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एकाला तिघा जणांनी गंभीर मारहाण केल्याची घटना २५ डिसेंबर रोजीच्या रात्री घडली होती. जखमीला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मारहाण करणार्‍या तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


मुस्तफा याहीया शिकलकर (वय ४५, रा. चुनगल्ली, बीड) असे मयत इसमाचे नाव आहे. मुस्तफा शिकलकर आणि भगवान मिश्रा (रा. चुनगल्ली, बीड) यांच्यात २५ डिसेंबर रोजी किरकोळ वाद झाला होता. यानंतर मिश्रा यांची पत्नी राजश्री आणि त्यांचा मुलगा सुरज या तिघांनी मिळून मुस्तफा यास लाथा बुक्क्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले. जखमी मुस्तफा यांना २५ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पोटात गंभीर मार लागल्याने पोटातील आतडे तुटल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला होता मात्र सकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती बीड शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी मारहाण करणारे भगवान मिश्रा, सुरज मिश्रा आणि राजश्री मिश्रा यांना ताब्यात घेतले. दुपारी उशिरापर्यंत या तिघांवर बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Most Popular

error: Content is protected !!