शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बीड (रिपोर्टर): अंबाजोगाई, केज शहरातील उद्यानांची दुरवस्था झालेली आहेत. त्या उद्यानांच्या विकासाची मागणी स्थानिकांमधून करण्यात आली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने दोन्ही शहरांसाठी प्रत्येकी 20 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंगळवारी (दि.12) केली आहे
.
निवेदनात म्हटले आहे की, अंबाजोगाई, केज शहरातील उद्यानांची दुरवस्था झालेली आहे. या उद्यानांच्या विकासासाठी अमृत 2.0 योजनेतून अंबाजोगाई शहरासाठी 20 व केज शहरासाठी 20 असा एकूण 40 कोटी रूपयांचा निधी द्यावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वस्त केले आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार असल्याने उद्यानांच्या विकासाचा प्रश्न मिटणार आहे.