Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडछत्रपती शाहू बँकेच्या मतमोजणीला सुरुवात

छत्रपती शाहू बँकेच्या मतमोजणीला सुरुवात


रात्री उशिरा येणार निकाल; मतमोजणीच्या सुरुवातीला जनाधारची आघाडी
बीड (रिपोर्टर) बहुचर्चित श्री राजर्षि शाहू महाराज कॉ.ऑपरेटिव्ह बँकेच्या 19 जागांसाठी परवा मतदान झाल्यानंतर आज सकाळपासून बीडच्या जुन्या बाजार समितीतील हमाल भवनात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 19 जागांसाठी जनाधार विरुद्ध समृद्धी पॅनलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीसाठी तब्बल 11 हजार 110 मतदारांनी आपल्या मताचा हक्क बजावला असून दुपारी एक वाजेपर्यंत एकही निकाल हाती लागला नव्हता. मात्र सुत्राने दिलेल्या माहितीनुसार 25 मतदानामागे एखाद दुसरे मत हे समृद्धी पॅनलला मिळते बाकी सर्व मते हे बँकेचे मूळ फाऊंडर असलेल्या स्व. जाहीर पाटील यांच्या जनाधार पॅनलला मिळत असल्याचे सांगण्यात येते. रात्री उशीरापर्यंत पुर्ण निकाल हाती येणार आहे.


मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात शाखा असणार्‍या बहुचर्चित श्री राजर्षि शाहू महाराज को.ऑपरेटिव्ह अर्बन बँकेची निवडणूक झाली. 15 हजार 462 मतदान असलेल्या आणि 19 सदस्यांच्या या बँकेसाठी दोन पॅनलने आपले 38 उमेदवार रिंगणात उतरवले होते. बँकेचे मूळ फाऊंडर असणारे स्व. जाहीर अप्पा पाटील यांच्या जनाधार पॅनलला आव्हान देण्यासाठी भीमराव जाहीर पाटील यांनी समृद्धी पॅनल रिंगणात उतरवले होते. यासाठी परवा मतदान झाले. 15 हजार 462 पैकी 11 हजार 110 मतदारांनी आपल्या मताचा हक्क बजावला. आज ही मतमोजणी बीड शहरातील जुन्या बाजार समितीतील हमाल भवनात सकाळपासून सुरू झाली आहे. मतमोजणीसाठी तब्बल 15 टेबल लावण्यात आले असून संध्याकाळी उशीरापर्यंत या निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणीच्या सुरुवातीला 25 पैकी एखाद दुसरे मतदान हे स्व. अप्पा जाहीर पाटील यांच्या पॅनल विरोधात असलेल्या समृद्धी पॅनलच्या उमेदवाराला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल सुरुवातीलाच स्पष्ट असला तरी विरोधक हे या निवडणुकीमध्ये किती मतदान घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Most Popular

error: Content is protected !!