Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमपेपरफुटी प्रकरणांमध्ये 28 जणांना अटक, 6 कोटींचा मुद्देमाल जप्त

पेपरफुटी प्रकरणांमध्ये 28 जणांना अटक, 6 कोटींचा मुद्देमाल जप्त


न्यासाचे अधिकारी सहभागी; पुणे पोलिसांचे धक्कादायक खुलासे
पुणे (रिपोर्टर) आतापर्यंत झालेल्या पाच पेपरफुटी प्रकरणांमध्ये पुणे पोलिसांनी आतापर्यंत 28 जणांना अटक केली आहे. या सर्वांकडून तब्बल सहा कोटींचा मुद्देमाल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरु आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


आतापर्यंत पाच पेपरफुटी प्रकरणात 28 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून जवळपास सहा कोटींचा मुद्देमाल आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे, असं अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं. 24 तारखेला झालेला आरोग्य विभागाचा ‘गट क’ चा पेपरही फुटला होता. यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारी देखील सहभागी होते असा खुलासा यावेळी त्यांनी केला. ‘गट ड’चा पेपर न्यासाचे अधिकारी, बोटले आणि बडगिरे अशा दोन माध्यमातून फुटला. दोघे एकमेकांशी संबंधित होते का याचा तपास सुरू आहे. ‘गट क’चा पेपर फोडण्यात न्यासाच्या अधिकार्‍यां-सोबत सहभागी असलेल्या दोन दलालांना अटक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!