परळी (रिपोर्टर): परळीपासून काही अंतरावर असलेल्या सारडगाव येथे लाचलूचपत प्रतिबंधक अधिकार्यांनी एका लाचखोरास लाच घेताना रंगेहात पकडल्याची माहिती समोर येत असून सदरचा लाचखोर कर्मचारी हा वीज कंपनीशी संलग्न असल्याचे सांगण्यात येते. सदरची घटना ही
दुपारी घडली असून अधिक माहिती वेळेअभावी मिळू शकली नाही.
याबाबत अधिक असे की, परळीपासून काही अंतरावर असलेल्या सारडगाव येथे लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी सापळा रचून कारवाई केली. वीज कंपनीशी संलग्न असलेला कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडला. संबंधित कर्मचार्यास घेऊन अधिकारी हे परळी ग्रामीण ठाण्यात निघाले असून लाच घेणार्या व्यक्तीचे नाव अथवा त्याचा हुद्दा संमजू शकला नही. कुठल्या कारणासाठी लाच घेतली याची माहितीही वेळेअभावी मिळू शकली नाही. मात्र परळी तालुक्यात एसीबीची कारवाई झाल्यानंतर लाचखोर अधिकारी, कर्मचार्यात खळबळ उडाली आहे. या घटनेची सविस्तर माहिती दुपारनंतर सायं. दैनिक बीड रिपोर्टरच्या ऑनलाईन पोर्टलवर मिळेल.