नेकनूर (रिपोर्टर): नेकनूर येथील कुटीर रुग्णालयाला नवनियुक्त सरपंच व उपसरपंचांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. दरम्यान रुग्णालयाचे डेपोटेशन रद्द करण्याची मागणी त्यांनी प्रशासकीय अधिकार्यांकडे केली. सदरील मागणी मान्य न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला आहे.
नेकनूर परिसरात सर्वात मोठे असलेल्या कुटीर रुग्णालयाला सरपंच, उपसरपंचांनी भेटी देऊन तेथील अडीअडचणी जाणून घेतल्या. या रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचार घेत असतात. रुग्णालयातील कर्मचार्यांना डेपोटेशनवर बीडमध्ये पाठविण्यात आल्याने रुग्णालयाचा स्टाफ कमी झाला आहे. त्याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागतो. सदरील हे डेपोटेशन तात्काळ रद्द करण्यात यावे नसता आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच सुंदर लांडगे, उपसरपंच सचीन शिंदे यांनी दिला आहे. या वेळी कुटीर रुग्णालयाचे डॉ. मुख्तार, डॉ. यमपुरे सह आदींची उपस्थिती होती.











