अंबाजोगाई (रिपोर्टर)ः-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अंबाजोगाई च्या वतीने केज विधानसभा मतदार संघातील विविध मागण्यासाठी माजीक्ष आ पुर्थ्वीराज साठे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालय समोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले
राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात शेतकर्याच्या खात्यात अनुदान रक्कम त्ताकाळ जमा झाली पाहिजे व पंचेवीस टक्के अग्रीम जमा न झालेल्या शेतकरी यांच्या खात्यात अग्रीम तात्काळ जमा झाले पाहिजे शेतकरी यांचे वीजबिल माफ करण्यात येऊन अखंडीत विजपुरवठा करण्यात यावा अंबाजोगाई व केज शहरात सुरु असलेल्या विकास कामात गैरप्रकार होत असून ते थांबून त्याची चौकशी करण्यात यावी अतिक्रमण मोहिमेत उठवण्यात आलेल्या छोटया धंदे वाल्याचे प्रयाई पुनर्व्हसन झाले पाहिजे ज्या शेतकर्यांचे नावे शेतकरी रेशन कार्ड मध्ये आहेत त्यांचे नावे पी एच एच मध्ये समाविष्ट केले पाहिजे रमाई घरकुल योजनेचा लाभ तात्काळ दिला पाहिजे या मागण्यासाठी आज येथील उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालय समोर माजी आ पुर्थ्वीराज साठे यांच्या नेतृतवाखाली धरणे आंदोलन करण्यात आले असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष अमर देशमुख तसंचे कल्याण भिसे हमीद आब्बा चौधरी प्रमोद गवळे यांच्या सोबत शेकडो कार्यकर्ते हजर होते.











