बीड (रिपोर्टर): पांगरी रोडवर असलेल्या आरके ट्रेडर्स या ठिकाणी अनाधिकृतपणे गुटखा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला झाल्यानंतर सदरील कर्मचार्यांनी कारवाई करून 32 हजार 971 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
पांगरी रोडवरील आर.के. ट्रेडर्स शॉप नं. 1 या ठिकाणी अनाधिकृतपणे गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला झाल्यानंतर कर्मचार्यांनी त्या ठिकाणी जावून कारवाई केली. त्याठिकाणी पान मसाला व सुगंधीत मसाला असा एकूण 32 हजार 971 रुपयांचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी संदीप देवरे यांच्या फिर्यादीवरून रमेश पाडुरंग खोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अमलदार पठाडे करत आहेत.