बीड (रिपोर्टर): आ. जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपूर्वी आ. जितेंद्र आव्हाड यांनी शिडी येथील पक्षाच्या कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले होते. या विधानावरून आव्हाड यांच्या विरोधात सर्वत्र टीकेची झोड उठवली जात आहे. बीड येथे त्यांच्याविरोधात तीव्र निदर्शने करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी अविनाश नाईकवाडे, सुमित कोळपे, अॅड. महेश धांडे, सुनील मिसाळ, धनंजय वाघमारे, सागर जवकर, ज्ञानेश कुलकर्णी, रोहीतसिंग ठाकूर, योगेश भागवत, अशोक तावरे, हनुमान मुळीक, ज्ञानेश्वर गायकवाड, अविनाश पवार, गोपाळ उनवणे, ओमप्रकाश शिंदे, बंडु जायभाये, विरेंद्र सानप, आशिष पाटील यांच्यासह आदींची उपस्थिती होती.