ज्ञानराधा बँकेतील ठेवीदारांनी आपल्या निढळाच्या घामाचा पैसा विश्वासाने ठेवला होता. त्यावर कुणालाही ड ल्ला मारू देणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बीड जिल्ह्यात आंदोलन सुरू झाल्यानंतर कुठे ग्रुपचे संचालक श्री सुरेश कुटे यांनी शिवसेना नेते सन्माननीय संजय राऊत साहेबांची भेट घेऊन एक महिन्याच्या आत आम्ही ठेवीदारांच्या रकमा परत करू असे म्हटल्यामुळे हे आंदोलन 25 जानेवारीपर्यंत स्थगित केले आहे. 25 जानेवारी पर्यंत जर ठेवीदारांच्या रकमा परत करण्यास सुरुवात नाही केली तर पुन्हा एकदा तीव्र आंदोलन उभे केले जाईल. ठेवीदारांच्या रकमा परत करण्यासाठी हा 25 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात येत आहे. ज्ञान राधा पतसंस्थेने ठेवीदारांचे पैसे परत न दिल्यास 26 जानेवारी रोजी गुन्हे दाखल करूठेवीदार व खाते दार यांच्यासोबत पैसे परत मिळे प्रयंत खंबीरपणे पाठीशी उभे राहणार असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांनी दिला