ईट फाट्यावर घडली आज सकाळी घटना
बीड (रिपोर्टर): तुझ्या मैत्रिनीसोबत माझे संबंध जुळवून दे, असे म्हणत एका 17 वर्षीय पुतणीवर चक्क चुलत चुलत्यानेच हल्ला केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान ईट फाट्यावर घडली. जखमी युवतीला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
बीडपासून काही अंतरावर असलेल्या एका गावातील 17 वर्षी तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. या तरुणीसोबत आज तिचा चुलत चुलता सुरेश भास्कर गवळी (रा. ईटकूर) याने हुज्जत घातली. तुझ्या मैत्रीनीसोबत माझे संबंध जुळवून दे, असे म्हणत तिच्यावर चाकूहल्ला केला. यात ती युवती जखमी झाली आहे. तिला उपचारार्थ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकाराने पिंपळनेर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.