समता परिषदेचे सर्वेसर्वा ना. छगन भुजबळ यांनी आपल्या एक्स हँडलवर एक व्हिडिओ सादर केला आहे. हा व्हिडिओ बीडमध्ये झालेल्या जाळपोळीवर भाष्य करणारा बोलका असून ‘चलो बीड’ ‘ओबीसी भटक्या विमुक्तांचा एल्गार, जिथे झाले ओबीसींवर वार’ असे स्लोगन आहेत. विधानसभेतील भाषणाचा काही भाग, जाळपोळीचे चित्र, पाहणीचे चित्र या टिझरमध्ये असून ‘मी येतोय, तुम्हीही या, ज्या बीड जिल्ह्यात जातीय द्वेषातून अमानूष हल्ले झाले त्याच बीडमध्ये आपण आज 13 जानेवारी रोजी भव्य ओबीसी एल्गार मेळावा घेत आहोत. ओबीसीतील 375 समाजातील बांधवांच्या अस्तित्वाच्या दृष्टीने या मेळाव्यास अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित राहा, आपली ताकद दाखवून देऊ या, एकच पर्व, ओबीसी सर्व, आरक्षण कशामुळे अस्त्विात आले हे आरक्षणाची मागणी करणार्यांनी आधी समजून घेतले पाहिजे.