आष्टी :- आष्टी नगरपंचायत निवडणुकीचे मतदान आष्टी शहरात ४ मतदान केंद्रावर अत्यंत सुरळीतपणे मतदान सुरू झाले. सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात मतदान होत आहे दुपार पर्यंत ३१.७२ टक्के ४ मतदान केंद्रावर मतदान झाले,यामध्ये ३८५ पुरुष तर ४०७ महिला एकूण ७९२ नागरीकांनी दुपारी १२ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आजच्या निवडणूकीच्या ४ जागांसाठी २१ उमेदवारांचे आज सायंकाळपर्यंत भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे.
आष्टी शहरात सर्वत्र पोलिसांचाही बंदोबस्त तैनात आहे. मतदान वाढवण्याकरिता विविध पक्षातील कार्यकर्ते मतदारांना कार, रिक्षा आणि टू व्हीलरवर मतदान केंद्रावर घेऊन येत आहेत.निवडणूक कार्यालयाकडून प्रक्रियेचे चित्रीकरण देखील सुरु या प्रक्रियेसाठी मतदान केंद्र अधिकारी, १ जोनल अधिकारी, ५ पोलिस अधिकारी, १ राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकडी,४५ पोलिस कर्मचारी तर २० निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.आज होणार्या मतदानासाठी १ हजार २८६ पुरूष तर १ हजार २११ स्त्री असे एकूण २ हजार ४९७ मतदार आपला निवडणुकीचा हक्क बजावणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विनोद गुंडमवार,नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी संजय कुलकर्णी यांनी दिली.
दरम्यान, आष्टी नगपंचायतीच्या ३,४,६,११ वॉर्डाची निवडणूक होत असून भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात समोरा समोर लढत होत आहे तर कॉंग्रेस व मनसेचा एक एक उमेदवार रिंगणात उतरलेला आहे. भाजपचे आ सुरेश धस,माजी आ भिमराव धोंडे यांनी भाजपच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी कॉनर बैठक व मतदाराच्या गाठी भेटी घेतल्या तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ बाळासाहेब आजबे, मेहबूब शेख, सतिश शिंदे यांनी ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी करण्यासाठी कॉनर बैठक घेऊन मतदार यांच्या घरी जाऊन गाठी भेटी घेतल्या. तसेच कॉंग्रेसने एक उमेदवार सहा वॉर्डात दिला त्यांना विजयी करण्यासाठी कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष रविंद्र ढोबळे मतदार यांच्या गाठी भेटी घेत विजय करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले तर एका जागेसाठी मनसेचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर स्वतः रिंगणात उतरलेले आहे त्यांनी ही विजयी होण्यासाठी मतदाराच्या गाठी भेटी घेतल्या आहेत.भाजप व राष्ट्रवादी यांच्यात ही निवडणूक एकंदरित चुरशीची होणार आहे आज मतदान होऊन कोणाला मतदार कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.