Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडआष्टीत ‘धस’का, केजात पाटील दाम्पत्यांना हिसका वडवणीत मुंडे बस्स, आ. सोळंके काठावर...

आष्टीत ‘धस’का, केजात पाटील दाम्पत्यांना हिसका वडवणीत मुंडे बस्स, आ. सोळंके काठावर पास


आष्टी, पाटोदा, शिरूरवर भाजपाचा झेंडा; वडवणीत राष्ट्रवादीचे वर्चस्व तर केजमध्ये त्रिशंकू
बीड (रिपोर्टर) आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, वडवणीच्या नेतृत्वाची परिक्षा असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत जनतेने पुन्हा आपले नेतृत्व जिल्ह्याला दाखवून दिले. आष्टी, पाटोदा, शिरूर नगरपंचायतीत आ. सुरेा धस हेच आपले नेतृत्व असल्याचे निकालातून जनतेने समोर मांडल्यानंतर विरोधकांसह पक्षांतर्गतल्या नेत्यांनाही धसांचा धसका बसावा, असा निकाल समोर आला. इकडे केजमध्ये विद्यमान खासदार रजनीताई पाटील आणि माजी मंत्री अशोक पाटील यांच्या कॉंग्रेसला जनतेने धुडकावून लावले आणि केजचे नेतृत्व जनविकास आघाडी करू शकते, असा कौल दिला. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर कॉंग्रेसचे अस्तित्व नगन्य असताना आता पाटील दाम्पत्यांच्या होम पिचही कॉंग्रेसमुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे तेथील नागरिकांनी आजच्या निकालातून दाखवून दिले. वडवणीत भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी असा सामना अत्यंत चुरशीचा झाला. साम-दाम-दंड-भेद सर्व काही वापरण्यात आले. इथे मात्र काट्याच्या लढतीत राष्ट्रवादी सरस ठरली. भारतीय जनता पार्टीच्या राजाभाऊ मुंडे, बाबरी मुंडेंचं नेतृत्व जनतेने धुडकावून लावत आ. प्रकाश सोळंके आणि माजी आ. केशवराव आंधळे यांना काठावर पास केलं. आजच्या निवडणुक निकालाने चांगल्या चांगल्या मातब्बरांना आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडलं.

Most Popular

error: Content is protected !!