बीड (रिपोर्टर) घरकुलासाठी लाच घेताना एका ग्रामसेवकाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान बीड पं.स.कार्यालयाच्या समोर घडली. सदरील ग्रामसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने पं.स.तील लाचखोरात एकच खळबळ उडाली. चिंचोलीमाळी येथील ग्रामसेवक हरिश केदार याने घरकुलासाठी एका लाभार्थ्याकडे पैशाची मागणी केली होती. याबाबत संबंधित लाभार्थ्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. आज ग्रामसेवकाला पैसे देण्याचे ठरले होते. पैसे देत असताना ग्रामसेवकाला लाचलुचपत विंभागाने रंगेहाथ पकडून अटक केली. ही कारवाई अडीच वाजण्याच्या दरम्यान जुन्या पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात करण्यात आली.